मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व ना.पंकजाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर जिल्ह्यात ३४८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.25
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. श्रीमती पंकजाताई मुंढे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नेते श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून जालना महानगर जिल्ह्यामध्ये एकूण ३४८ जणांनी रक्तदान करून सामाजिक भान जपून रकतदानाचा विक्रम केला.
यामध्ये जुना जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश निकम यांच्या मंडळात सर्वाधिक १२१ रक्तदान झाले, तसेच जालना ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय डोंगरे यांच्या मंडळात १११, पूर्व जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. अमोल धानुरे यांच्या मंडळात ६१, नविन जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील खरे यांच्या मंडळात ५५ रक्तदान झाले. असे एकूण जालना महानगर जिल्ह्यामध्ये एकुन 348 रक्त दात्यांनी रक्तदान केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राजेश राऊत, बद्रीनाथ पठाडे, रामेश्वर भांदरगे, विमलताई आगलावे, विजय कामड, सतीष जाधव, सोपान पेंढारकर, धनराज काबलीये, भागवत बावणे, कपिल दहेकर, अर्जुन गेही, अनिल सरकटे, संध्याताई देठे, सुभांगीताई देशपांडे, सखुबाई पणबिसरे, सिद्धिविनायक मुळे, राजेंद्र भोसले, शशिकांत घुगे, सुभाष मामा पवार, राजू गवई, सोमेश काबलीये, सय्यद इम्रान, वसंत शिंदे, सुनील पवार, शिवराज जाधव, रवींद्र अग्रवाल, सुमीत सुरडकर, सुहास मुंढे, शिवराज नारीयलवाले, शाम ऊगले, सिद्धेश्वर हाजबे, सोमेस काबलिये, मनोज बिडकर, जुनेद मिर्झा, माणिक फड, विष्णु दादा भूतेकर, बबनराव सिरसाठ, काकासाहेब घुले, पुंजाराम भूतेकर, कैलास उबाळे, मुकेश चव्हाण, संजय जाधव, राजाराम (राजे) जाधव, सतीश केरकळ, नागेश अंभोरे, गजानन खरात, बद्रीनाथ भसांडे, दौलत भुतेकर, महेश मुळे, विष्णु डोंगरे, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर राठोड, विजय मोहिते, अनिल यशवंते, तुकाराम कळकुंबे, नारायण मोहिते, संतोष खंडेलवाल, कृष्णा गायके, गोपाल चौधरी, प्रदीप देठे, जगदीश यंगूपटला, सुदर्शन काळे, अजय कोल्हे, गौरव गोधेकर, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, देविदास देशमुख, गुलाब पणबिसरे, सिद्धार्थ संचेती आदींची उपस्थिती होती.
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदानाच्या माध्यमातून साजरा केला जात आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आपल्या थोड्याशा योगदानातून एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचू शकते असे त्यांनी सांगितले व सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल व रक्दात्यांचे आभार मानले.
शिबिरात संकलित झालेले रक्त जनकल्याण रक्तपेढी, जालना यांच्या सहकार्याने संकलित करण्यात आले.



