pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

संतनाथबाबाच्या कार्याचा प्रसार व्हावा —–भाविकाच्या मनोगतातुन निर्धार…

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पुणे/प्रतिनिधी,दि.17

प.पू.संतनाथबाबा हे प्रसन्न व्यक्तिमत्वाचे होते.त्यांना भेटल्यावर नविन अध्यात्मिक उर्जा मिळत असे.त्यांच्या अनुभूती कार्याचा प्रसार विविध माध्यमातून करण्याचा निर्धार भाविकांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला.प.पू.सद्गुरु विश्वनाथबाबा यांच्या सहाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आईमाता मंदिर परिसर,गंगाधाम येथील ॐसाई विश्वनाथ दरबार येथे प.पू.विश्वनाथबाबा यांच्या सहाव्या पुण्यस्मरण कार्यक्रम निमित्त भजन ,भाविकांचे मनोगत ,महाआरती,महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मान्यवर भाविक शशिकांत मोरे ,अखिलेश शुक्ला ,शितल पेठारे आदींनी संतनाथबाबाचा स्वभाव ,सहवास व अनुभव कथन केले.बाबा हे भाविकांचे श्रध्दास्थान होते.ते भाविकांचे समस्या निवारण करुन मार्गदर्शन करीत असत.यामुळे या सत्संग दरबार मधुन एक नविन उर्जा मिळत असे.त्यांनी सुरु केलेले कार्य असेच पुढे नेण्यासाठी भाविकांनी तन ,मन ,धनाने सहकार्य करावे.व संतनाथबाबाच्या कार्याचा प्रसार करावा.असे भाविकांनी याप्रसंगी निर्धार व्यक्त केला.तर गुरुमाऊली आईमाता श्रीमती नीताजी रांका यांनी मार्गदर्शन करतांना असे सांगितले की ,श्रध्दा भावनेने पाहिल्यास बाबा येथेच आहेत.त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्य केल्यास त्याची प्रचिती दरबार मधील कार्यक्रमातून नक्की येईल. सुख ,दुःख याची चिंता न करता आम्ही त्यांचेसाठी जीवन समर्पित केले आहे.असेही त्यांनी भावुकतेने व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी प्रबोधनपर केले.भजन कार्यक्रमात प्रामुख्याने अखिलेश शुक्ला (पंडीत),शिवसहायसिंह बनारसवाले ,डीगांबर हनमंते,प्रणव रांका आदीनी सहभाग घेतला.प.पू.सद्गुरु विश्वनाथबाबा मंदिर ठिकाणी यावेळी आकर्षक सजावट करण्यात आली होती,यामध्ये मध्यभागी हुबेहुब आदीमाता आदीशक्ती देवीचे रुप. प.पू,संतनाथबाबा पादुका समाधीवर महाकाल ची प्रतिकृती ,बाजुस पर्वत रांगा ,स्वागत करणारे मावळे चित्र हे मनमोहक होते.असा हा प्रेक्षणीय आकर्षक सजावट प्रामुख्याने एलके गुप्ता आणि सहकारी ,नितीन पेठारे ,श्रध्दा आदीनी तयार करण्यास परिश्रम घेतले.या कार्यक्रमात भाविकांनी गुरुमाऊली आईमाता श्रीमती नीताजी रांका यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे