pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा व समृद्धीचा — हरिभक्त परायण विठू माऊली

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 जाफराबाद/विशाल देशमुख,दि 17

दिवाळी कशी साजरी करावी त्याचे महत्त्व दिवाळी हा सण प्रकाशाचा समृद्धीचा आणि आनंदाचा हिंदू सण आहे जो दिव्याची रांग या संस्कृत शब्दावरून आला हा सण साधारणपणे पाच दिवसाचा असतो आणि अंधारावर प्रकाशाचा वाईट यावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवितो या सणामध्ये घराची स्वच्छता दिव्याची आरास रांगोळी काढणे फराळ बनवणे एकमेकांना वस्तू भेट देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात दिवाळीचे पाच दिवसाचे महत्त्व पहिला दिवस वसुबारस या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस त्याला गोवत्सद्वादशी असे म्हणतात या दिवशी गाईची वासराची पूजा केली जाते धनत्रयोदिशी या दिवशी धन आणि आरोग्याची देवता यम याची पूजा केली जाते आणि नवीन वस्तूची खरेदी करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशी छोटी दिवाळी या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता या दिवशी पहाटे अभंग स्नानाला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीपूजन मुख्य दिवाळी हा दिवस दिवाळी मुख्य लक्ष्मीपूजन दिवस आहे या दिवशी घरात लक्ष्मी आणि कुबेर याची पूजा केली जाते. आश्विन अमावस्येपासून लक्ष्मी कुबेर देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि स्वच्छता सुंदरता ज्या ठिकाणी दिसते सात्विकता ज्या ठिकाणी असते तिथे वास्तव्य करते म्हणून घराची स्वच्छता करण्यास विशेष महत्त्व आहे लक्ष्मीपूजन केल्यामुळे वर्षभर आपल्याला समृद्धी धनप्राप्ती लाभ होत असतो

बलिप्रतिपदा पाडवा या दिवशी विष्णू ने वामन रूप घेऊन बळीराजाला पाताळात गाडले बळीराजाचा स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो होती असे मानले जाते साडेतीन मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे .यम द्वितीया या दिवशी यम देव आपली बहीण यमी हिचे अक्षन घ्यायला गेले होते तेव्हापासून भाऊबीज प्रचलित आहे भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेट वस्तू देतो दिवाळीच्या अध्यात्मिक महत्त्व अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणारा सण आहे धार्मिक परंपरा दिवाळी अनेक धार्मिक कथेशी जोडलेली आहे जसे की रावणाचा वध करून श्रीरामाचे अयोध्येत परतणे या सणामुळे सामाजिक सण या सणामुळे कुटुंबे एकत्र येतात नातेवाईकांच्या भेटी घेतल्या जातात सामाजिक संबंध दृढ होतो सांस्कृतिक विविधता दिवाळी हा फक्त हिंदूचाच नाही तर शिख जैन धर्माचे लोक यांचाही सण वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरा करतात पौराणिक माननीयतेनुसार श्री रामाचा 14 वर्षाचा वनवास संपून ते अयोध्येत परत येतात त्यावेळेस मोठ आनंद उत्सव दिवाळी साजरी केली होती तेव्हापासून दिवाळी म्हणून साजरा केला जातो पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते रावण वध करून श्रीराम अयोध्येला परतल्यावर जनतेने फटाके फोडून आणि दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते अशी ही कथा प्रचलित आहे वाईट शक्तीचा नाश आणि आनंद उत्सव साजरा करणे हे फटाके फोडण्याचे कारण आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुरोहित श्री विठू महाराज टेंभुर्णी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे