pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अल्पसंख्यांक समुदायातील शाळा, महाविद्यालयांनी पायाभूत सोयी-सुविधा मिळण्यासाठी अनुदान योजनेचा लाभ घ्यावा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.30

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये “राज्यातील धार्मीक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” राबविण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रकान्वये सन 2025-26 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार असल्याने अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासन मान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांची शिफारस करण्याचे निर्देश दिले आहे. यास अनुसरुन शासन निर्णय दि. 07.10.2015 मधील कार्यपध्दतीचा अवलंब करुन तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शाळांनी,संस्थांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याचा अंतिम दि. 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे, याची नोंद घ्यावी. विहीत मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. सदर योजनेच्या शासन निर्णयासोबतच्या अर्जाचा नमुना (https://jalna.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे