सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजित पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी,दि.3
भारताचे लोहपुरूष माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालना महानगर भाजपाच्या वतीने उद्या दि.०४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा स्वातंत्र्य सैनानी जनार्धन मामा चौक यांच्या पुतळ्यापासून ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या पदयात्रेमध्ये जालना महानगरातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करावी असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी आज दि.०३ नोव्हेंबर रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, सतीश जाधव, सोपान पेंढारकर, अर्जुन गेही, धनराज काबलिये, सिद्धिविनायक मुळे, सुनील खरे, महेश निकम, संजय डोंगरे, भागवत बावणे, बाबा उगले, वसंत शिंदे, रमेश गौरक्षक, सुनील पवार, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, येणारा काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा काळ असून या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणी च्या माध्यमातून आपल्या वार्ड, प्रभाग, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये जाऊन पदवीधर यांच्या गाठीभेटी घेऊन मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी व एक प्रकारे आपल्या प्रचाराचा एक टप्पा आपल्या गट, गणातील व प्रभागातील मतदारापर्यंत पोहचवून आपला संपर्क वाढवावा जेणेकरून जनतेमध्ये आपली ओळख निर्माण होईल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपल्या पाठीशी उभी राहील व मराठवाडा पदवीधर मतदार संघामधील जालना महानगर जिल्ह्यास देण्यात आलेले मतदार नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करण्यास मदत होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पदयात्रेमध्ये आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानेश्वर ढोबळे, प्रवीण मोहता, सुनील राठी, विजय पवार, राजेंद्र भोसले, देविदास देशमुख, राजेश जोशी, आनंद झारखंडे, शिवराज जाधव, सुहास मुंडे, शारदाताई काळे, सखुबाई पणबिसरे, वैशाली बनसोडे, संगीता पांजगे, शीतल तनपुरे, विकास कदम, प्रशांत गाढे, तूलजेश चौधरी, विष्णू डोंगरे, डोंगरसिंग साबळे, विशाल उफाड, अर्जुन राऊत, रोहित नलावडे, रोहित खोडवे, करण निकाळजे, गजानन खरात, सुदर्शन काळे, गौरव गोधेकर, सागर वाहुळकर, महेश मुळे, कृष्णा गायके, रामलाल जाधव, संजय माधवले, रमेश गोगडे, आनंद भगत, बद्री जांगडे, राजेश देसार, श्रीकांत शेलगावकर, शितलप्रसाद पांडे, विजय मोहिते, बाबुराव भवर, नागेश अंभोरे, हरिभाऊ गोरे, योगेश शिमगे, कैलास सोळुंके, कृष्णा खिल्लारे, बद्रीनारायण भासांडे, उमेश अग्रवाल, चेतन देसरडा, मुकेश चव्हाण, सुधाकर खरात, सुभाष सले, अमरदीप शिंदे, भगवान चांदोडे, प्रमोद गंडाळ, सेवकराम नारियलवाले, दत्ता जाधव, अनिल संचेती, बाळू कावळे, सिद्धेश्वर हजबे, गजानन नरवडे, आदीची उपस्थिती होती


