pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा ठाम आवाज – अजय बनकर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

अतिवृष्टीमुळे जाफ्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाने आज आवाज उठवला आहे. जाफ्राबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी, जालना यांना सविस्तर निवेदन

सादर करण्यात आले. या निवेदनात जाफ्राबाद, टेंभुर्णी आणि कुंभारझरी महसूल मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रात तातडीने समावेश करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली असून, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले

आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याची दखल घेऊन शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय बनकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रस्थानी

राहिला आहे. शेतकऱ्यांचे हक्क आणि सन्मान यासाठी काँग्रेस सतत लढत राहील. शासनाने विलंब न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.”

या निवेदनावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जालना शहराध्यक्ष रहमान शहा, सेवादल जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, युथ शहराध्यक्ष वसीम शेख, तसेच

जेष्ठ नेते फकीरा वाघ, प्रतापराव लहाने पाटील, अतिक खान, कलीम खान, सलमान खान, अंकुश बाढराज, धमा खरात, बाबासाहेब खरात, सुरेश जाधव, रईस शेख, विनोद कुमार, आकाश सूतार, शकील शेख, अभिषेक मूलवंडे, पंकज लोखंडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे