pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विविध ग्रंथ पारायण,गुरुवर्य श्री श्री सद्गुरू नराशाम महाराज पाद्यपुजा,ग्रंथ मिरवणुक व किर्तन सोहळ्याचे वरदनगरी,असर्जन नांदेड येथे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.4

नांदेड शहरातील वरदनगरी भगतसिंग चौक असर्जन येथे विलासराव चितळकर यांच्या गुरूकृपा निवासस्थानी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,अमृतानुभव,संत तुकाराम महाराज गाथा, संत नामदेव महाराज गाथा, संत एकनाथ महाराज गाथा, एकनाथी भागवत अशा विविध ग्रंथाचे पारायण सौ.गंगाबाई विलासराव चितळकर यांनी केले आहे. ह्या सर्व ग्रंथाचा
पारायण सांगता सोहळा गुरूवर्य श्री श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे.ग्रंथ मिरवणुक सकाळी १०.३० ते ११, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांचे कीर्तन ११ ते १ , गुरूवर्य नराशम महाराज पाद्यपूजा दुपारी १.०० ते १.१५ गुरूवर्य सद्गुरू नराशाम महाराज यांचे उपदेशपर प्रवचन दुपारी१.१५ ते १.३०
या पद्धतीने कार्यक्रम संपन्न होणार आहेत.या कार्यक्रमासाठी सद्गुरु नराशाम महाराज यांची सर्व शिष्य मंडळी, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी, चितळकर परिवारातील पाहुणे मंडळी, मित्रपरिवार व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आव्हान श्री विलास संतोबा चितळकर,सौ.गंगाबाई विलास चितळकर, सतीश विलास चितळकर, संदिप विलास चितळकर व समस्त चितळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तरी कृपया वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आव्हान विलासराव चितळकर यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे