pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णीत कार्तिक स्नान दिंडी सोहळ्या ला ४९ वर्षात पदार्पण, कार्तिक पौर्णिमेला भंडाऱ्याने होते सांगता. महेश गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6

कार्तिक स्नान दिंडी सोहळयाची परंपरा मागील 48 वर्षापासून भाविकांनी जपली असून तब्बल पाच तपा पासून सुरू असलेली भक्तिभावाची परंपरा अजून ही सुरू असून कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा दिंडी सोहळा कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना अखंड चालू असतो.यात गावातील चंदन बाबा गुरुदेव भक्त मंडळाचे भाविक भल्या पहाटे स्नान करून संपूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भक्ती फेरी काढतात. येथील पुरातन दत्त मंदिर पासून सुरू झालेली ही फेरी संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालत पुन्हा दत्त मंदिरावर जाऊन विसर्जित होते. या फेरीमुळे संपूर्ण कार्तिक महिन्यात पहाटे ४ ते ७ या वेळात संपूर्ण गाव टाळ मृदंग आणि भक्ती संगीताच्या सुमधुर स्वरात हरवून जाते. या दिंडीचे मार्गावरील ग्रामस्थ ठीक ठिकाणी मोठ्या आदराने स्वागत करतात. गृहिणी सडामार्जन करून आपापल्या घरासमोर रांगोळी काढतात. दिंडीतील सहभागी भाविकांना चहापान व फराळ ही केले जाते. या दिंडीत वयस्का पासून अगदी लहान मुलांपर्यंत सर्व समाजातील स्त्री पुरुष भाविक सहभागी होतात.

चौकट- संत चंदन बाबा यांच्या प्रेरणेने प्रारंभ.गावातील संत चंदन बाबा यांच्या प्रेरणेने कार्तिक स्नान दिंडी सोहळ्याला सन 1978 मध्ये प्रारंभ करण्यात आला. कै.लक्ष्मण उखर्डे, कै.रंगनाथ भागवत, कै.मारोतराव देशमुख, कै.बाळाजी धनवाई, कै. विठोबा घोडके, व इतर तत्कालीन गावकऱ्यांनी, भक्त मंडळांनी तेव्हापासून ही परंपरा आज पर्यंत अखंड चालू आहे. हा दिंडी सोहळा सुरू करण्यासाठी चंदन बाबा भक्त परिवारातील रघुराम उखर्डे, गंगाराम धनवई, रामकिसन सोरमारे, शेनफड उखर्डे, महादू भागवत, तानाजी उखर्डे, रामदास डोमाळे, हरिभाऊ उखर्डे आदींनी पुढाकार घेतला. आजही या सोहळ्यात खंडू भागवत, सुरेश उखर्डे, शंकर उखर्डे, भाऊसाहेब देशमुख, समाधान उखर्डे, भागाजी पाचे, बालू डोमाळे, सांडू उखर्डे, ज्ञानदेव गोफणे, भानुदास मघाडे, महादू इंगळे, मंजीराम बोराडे, भगवान पवार आदी अनेक भाविक सेवा देत आहे.

————————————————————–

भंडाऱ्याने झाली सांगता. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या कार्तिक स्नान सोहळ्याची सांगता उद्या बुधवारी कार्तिक पौर्णिमेला होणार आहे. यावेळी भंडाऱ्याचे आयोजन केले गेले आहे. येथील दत्त मंदिरावर होणाऱ्या या भंडार्यात जवळपास ११ क्विंटल वरण- पोळीचा महाप्रसाद बनविला गेला होता. या भंडाऱ्यात गावातील सर्व जाती धर्मातील समाज बांधव मोठ्या हिरीरीने सहभागी होत असतात.अशा कार्यक्रमातून गावची सामाजिक एकता आणखी दृढ होते अशी प्रतिक्रिया दिंडी सोहळ्याचे रघुराम उखर्डे यांनी व्यक्त केला असून या वेळी महेश गिरी महाराज यांच्या किर्तन रुपी सेवा ने या कार्यकांची सांगता होऊन मोठा भंडारा पार पडला असून त्यांनी टेंभुर्णी येथील सगळ्या सप्ताहाचे कौतुक करून सर्व गावकरी या मध्ये सहभाग घेऊन त्यांचा आनंद घेऊन कार्यक्रम चांगला करतात असे सांगून सगळ्या भक्त मंडळीचे विशेष करून कौतुक करून त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आणि सर्व कार्यक्रम झाल्या नंतर स्वतः हा पंगत मध्ये फिरून समाधान व्यक्त केले.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तांचा सागर या भंडाऱ्यामध्ये उपस्थित असतो. भक्ती भवानी टेंभुर्णी नगर मध्ये भंडार्यांचे महापंगत नेहमीच होत असते परंतु कार्तिक भंडारा हा मोठा असतो आणि यामध्ये सर्व गावकरी सहभागी होत असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे