टीईटी परीक्षा सक्तीला विरोध, प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनेतील कार्यरत इयत्ता १ ली ते ८ वी वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती करणारा निर्णय दिलेला आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोकन याचिका दाखल करावी व यापुढे सेवेत नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात यावी व सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना यामधून सूट देण्यात यावी किंवा सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन ती पात्रता पूर्ण करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने उप जिल्हाधिकारी मा.श्री शशिकांत हदगल साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री बाबासाहेब जुंबड,मंगेश जैवाळ, रवींद्र काकडे, दीपक दराडे, राजेश सदावर्ते, सिद्धार्थ गजभिये, सुभाष मस्के, देवेंद्र बारगजे, सुभाष भडांगे, भगवानराव जायभाये,विकास पोथरे, गणेश भुतेकर,संतोष देशपांडे, प्रमोद पवार,महादू तांबे,महिला पदाधिकारी साधना गिऱ्हे, नीता पाटील,सुरेखा ताटीकोंडा, रेणुका आडेप इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते


