pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र व स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम या जागेची मा.जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा – सौ संध्या देठे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.19

जुना जालना येथील प्रभाग क्रमांक नऊ [9]मधील स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम ची प्रचंड बिकट अवस्था झाली आहे .
या ठिकाणी खेळाडूसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही तसेच या जागेवर टवाळखोर मद्यपी व मोकाट जनावरे याचा मुक्त संचार होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक असुरक्षित आहे. यासाठी सदरील स्टेडियमच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करून जॉगिंग ट्रॅक कबड्डी खो-खो ग्राउंड महिलांसाठी योगा हाॅल स्केटिंग ग्राउंड अशी व्यवस्था असलेल्या प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत तयार करून विकास काम हाती घ्यावे तसेच जुना जालना येथील नागरिकांसाठी महानगरपालिकेमार्फत शिवनेरी नगर येथे आरोग्य केंद्र चालवले जाते या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरला बसण्यासाठी उपयुक्त जागा नाही महिला नर्सेस व महिला डॉक्टर येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटसाठी शौचालय पिण्याचे पाणी व्यवस्था उपलब्ध नाही.वरील परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे आजूबाजूच्या सर्व नागरिकांचे या अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे म्हणून सदरील बाब लेखी निवेदना द्वारे माननीय जिल्हाधिकारी तथा प्रशासक आयुक्त जालना शहर महानगरपालिका श्रीमती अशीमा मित्तल मॅडम यांच्या निदर्शनास आणून प्रत्यक्षात त्यांनी भेट घेऊन जागेची पाहणी करून वरील दोन्ही जागेचा नवीन प्रस्ताव तयार करून विकास कामा हाती घ्यावे अशी मागणी सौ संध्या देठे यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे