pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

त्या चार ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यतेचे आदेश तात्काळ द्या

 राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

जाफराबाद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रशासकीय मान्यता आदेश सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन गटविकास अधिकारी जाणीवपूर्वक देत नसल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी २० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष रामधन कळंबे यांनी गट विकास अधिकारी नारायण खिल्लारे यांना चांगले धारेवर धरले. जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा,देऊळगाव देवी या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता झालेली असताना पंचायत समिती गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे यांनी विद्यमान आमदार यांच्या स्विय्य सहाय्यक यांना सदर प्रशासकीय मान्यतेचे आदेश परस्पर देऊन टाकलेले आहेत. एका इमारत बांधकामासाठी तब्बल 20 लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला आहे आणि सदर कामांचे टेंडर ग्रामपंचायत ने करायचे आहे यापूर्वी सुद्धा निमखेडा बुद्रुक आणि पिंपळगाव कड या ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय मान्यता अशाच पद्धतीने गायब करण्यात आलेले आहेत. सदर प्रशासकीय मान्यता तात्काळ देण्यात याव्यात अन्यथा पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा श्री कळंबे यांच्यासह संबंधित ग्राम संसदेच्या सरपंचांनी दिल्यानंतर सोमवारी या प्रशासकीय मान्यता सदर ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात येतील असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे