pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र भूषण सुवर्णपदक विजेती ईश्वरी मीरा निलेश सोनवणे हीचा क्रीडामंत्री मा.ना.श्री माणिकराव कोकाटे साहेबांच्या हस्ते सत्कार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.21

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ईश्वरी सोनवणे हिने तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले या प्रसंगी राज्याची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी ईश्वरी सोनवणे हीचा सन्मान केला.
जम्मू येथे ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये देशभरातून खेळाडू सहभागी झाले होते यात महाराष्ट्र राज्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील ईश्वरी निलेश सोनवणे ही तायक्वांदो क्रीडा प्रकारासाठी प्रतिनिधित्व करत होती. यावेळी ईश्वरीने १९ वर्षाखालील 52 किलो वजनी मुलींच्या गटात स्पर्धा केली यात तिने आसाम बिहार आणि हरियाणा राज्यातील खेळाडूंना मात देत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले या विजयानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी ईश्वरी निलेश सोनवणे व प्रशिक्षक संतोष बसणेत सर व तिचे आई वडील यांचा नाशिक येथे आपल्या निवासस्थानी सत्कार केला व भविष्यातील खेळाबद्दल मार्गदर्शन केले. या सुवर्णपदक विजयानंतर महाराष्ट्रभरातून सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ईश्वरीला भावी खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे