pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्रीमती.जे.बी.के विद्यालयात “शिक्षक पालक मेळावा” उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21

टेंभुर्नी शहरातील नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित. श्रीमती. जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात २० नोव्हे.२०२५ रोजी इ.१० वी, व इ.१२वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा “शिक्षक पालक मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला, नवभारत शिक्षण संस्थेचे आधारवड- स्वर्गिय.गोपिकिशन काबरा यांच्या स्मरणार्थ विद्यालयात आयोजित शिक्षक पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी. शिक्षण संस्थेचे सचिव. सत्यनारायण सोनी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघ समितीचे उपाध्यक्ष. मनोज पंडित,संचालक. प्रा.डि.एस. देशमुख, मुख्याध्यापक. व्हि.के.जाधव, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख. एस.बी.बोरकर, रेखाताई सपकाळ सुरेश साळुंखे, किशोर कांबळे, शांताराम पवार, राजु गवई, संतोष साळवे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक. व्हि.के.जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्या मागची भूमिका व उद्देश या विषयावर आपले मत मांडले, शिक्षक पालक मेळाव्यात *इ.१० वी, व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परिक्षेला सामोरे जातांना घ्यावयाची काळजी,
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालक यांची भूमिका, *विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक, भावनिक, शारीरिक विकासा साठीच्या उपाययोजना, *कॉपी मुक्त, भयमुक्त वातावरणात परिक्षेला सामोरे जातांना घ्यावयाची काळजी.या संबंधित मुद्द्यांवर शिक्षक आणि पालक यांनी आप -आपले मत मांडले, विद्यार्थी मोबाईलच्या अतीआहारी गेल्यामुळे होणारे नुकसान, अभ्यासाकडे होणारे दूर्लक्ष, या बाबतीत शिक्षक पालक मेळाव्यात सकारात्मक विचार मंथन करण्यात आले, अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोजित केलेल्या या पालक मेळाव्याचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे व विद्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष.सत्यनारायण सोनी यांनी आपले मत मांडत असतांना पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद विद्यार्थ्यांच्या विकासासाठी किती आवश्यक आहे,व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन शिक्षक व पालकांनी भूमिका पार पाडली तर विद्यार्थी आपल्या जीवनात कसा यशस्वी होऊ शकतो या बाबतीत आपले मत मांडले, शिक्षक पालक समितीच्या सदस्या रेखाताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांच्या सवयी, चौरस आहार,त्यांचे शारीरिक मानसिक,भावनिक, बदल व विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षक व पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद कसा द्यावा या बाबतीत आपले मत मांडले. शिक्षक पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक. एस.बी.बोरकर यांनी संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पालक आणि शिक्षक कटीबद्ध असले पाहिजे तरच भारताचे आदर्श नागरिक घडतील असे मत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.भिवसन ससाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र जगताप यांनी मानले. शिक्षक पालक मेळाव्यात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश इंगळे, संजय कुलकर्णी, कैलास भुतेकर, राजेश शेवाळे,डि.एस.उखर्डे, समाधान कांबळे, रवींद्र मोरे,प्रा.सुनिल बनसोडे, प्रा.डॉ.अरूण आहेर, सि.डी.उखर्डे, प्रा.रामदास भांगे, प्रा.के.जी.जाधव, प्रा.गजानन धोटे, प्रा.डॉ.आनंद जाधव, वासुदेव क्षिरसागर, उज्ज्वला आवटी, मंजुषा भिलावेकर, एफ.ए.शेख, ज्योतीताई जाधव, राजुभाऊ डोमळे, विजया लंबे, दिपक देशमुख आदींनी परिश्रम घेतले.अतिशय उत्साही वातावरणात शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे