pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,च्या डिजिटल मीडिया च्या बिड जिल्हाध्यक्षपदी अनिल आगुंडे यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

बीड/प्रतिनिधी,दि.29

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई ची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन दि २८ जानेवारी मंगळवार रोजी मोरेश्वर सभागृह कोथरूड,पुणे येथे
आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या डिजिटल मिडियाच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी अनिल आगुंडे यांची निवड करण्यात आली.
ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजयजी भोकरे साहेब, राजकिय विश्लेषक देसाई, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे,
प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे,अक्षय पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली. यावेळी राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अनिल आगुंडे हे गेल्या आठ नऊ वर्षापासून पत्रकार संघाचे गेवराई तालुका कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय जी भोकरे यांच्या आदेशावरून डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते अनिल आगुंडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आतापर्यंत जसे मनोभावे या संघाचे कार्य मी केले त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने मी महाराष्ट्र पत्रकार संघासाठी काम करेल व पत्रकार संघाचे संघटन करून जिल्हाभरामध्ये संघटनेचे जाळे निर्माण करेल असे मनोगत यावेळी अनिल आगुंडे यांनी व्यक्त केले. दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे,प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष, सुनील पोपळे,गेवराई तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे, साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धा चे संपादक अमोल कापसे, साप्ताहिक लोकनाथ चे संपादक शेख अब्दुल रहमान, गेवराई टाईम्स संपादक शेख सलमान,राम संभाहारे,राहुल गिरे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे