pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून  विशेष मोहिमेचे आयोजन  

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 26  

भारतीय संविधानाला 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाचे औचित्य साधुन जालना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत दि. 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत समिती कार्यालयात विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. समिती कार्यालयात दररोज कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी तसेच अर्जदार, पालक यांच्या उपस्थितीत त्यांना संविधानाचे वाचन,भारतीय संविधानाचे महत्व याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रियेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य संगीता मकरंद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे