pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 28

जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे व उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे यांनी सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचे स्मरण उपस्थितांना करून दिले. पुढे बोलताना ते म्हणाले महात्मा फुले यांनी उभारलेली सत्यशोधक चळवळ, स्त्री शिक्षणासाठी मुलींची शाळा तसेच शोषित वंचित समाजाला उभारी देणाऱ्या त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. आजच्या समाजाने देखील महात्मा फुले यांच्या मानवतावादी दृष्टिकोनातून वागणे आवश्यक आहे अशी खंत देखील व्यक्त केली. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या साहित्यावरही प्रो.डॉ.सुनील मेढे यांनी सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रो.डॉ.संतोष पहारे यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे