5 डिसेंबरच्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार आहे. याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालके यांनी म्हटले आहे की
शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे, ( टी ई टी ), जुनी पेन्शन योजना लागू करणे,, शिक्षकांना 10,20,30 ची आश्वासित योजना लागू करणे, संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या थांबवलेल्या पदोन्नती त्वरित करणे, शिक्षकांना फक्त अध्यापनाचीच काम देणे,आम्हाला शिकवू द्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवू द्या यासह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या एकदिवसीय लाक्षणिक संपात व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक 23 रोजी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शिक्षक ,विद्यार्थी व शाळा यांच्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या मोर्चासाठी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया च्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
राष्ट्रीय उपाध्यक्ष उत्तमराव, जिल्हाध्यक्ष भगवान भालके सरचिटणीस शांतीलाल गोरे* जिल्हा नेते अजहर पठाण, कार्यकारी अध्यक्ष अण्णा इंगळे,कार्याध्यक्ष उद्धवराव खांडेभराड, कोषाध्यक्ष
शिवाजीराव देशमुख, संपर्कप्रमुख वसंता शेवाळे* जाफराबाद तालुकाध्यक्ष,
विनोद कळंबे, सुनील गिरणारे,अरूण कदम,.
राजेश लामगे, भाऊसाहेब जाधव,सोपान पाष्टे,शशिकांत कावळे यांनी केले आहे.


