pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुलीच्या वाढदिवसानिमित्त पालकाकडून नळविहीरा शाळेला भेट २० चटयांची

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29

नळविहीरा ता.जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी भागवत मोरे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिचे पालक भागवत मोरे यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी २० चटया भेट देऊन तिचा वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांना शालेय परिपाठासाठी चटयाची आवश्यकता असल्याने त्यांनी वाढदिवसा वरील अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी चटाया भेट दिल्या. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या चटायांमुळे शालेय परिपाठ आणि अन्य शालेय उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर गाडेकर, उपसरपंच सुनील मोरे,प्रल्हाद गाडेकर, बाबुराव मोरे,अंबादास जाधव, राजू मोरे, लक्ष्मण गाडेकर, हरीश कोल्हे, रामभाऊ गाडेकर, संतोष मोरे, संतोष गाडेकर, दत्तू गाडेकर,अमोल गाडेकर,अक्षय मोरे,मनोहर जंजाळ, परमेश्वर जंजाळ, सतीश जंजाळ, आत्माराम लोखंडे महादू गाडेकर यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी परी म्हस्के या पाचवीतील विद्यार्थिनीचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सुनील मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर झगरे यांनी तर आभार विनोद कळंबे यांनी मानले कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिवहरी नागरे, दत्तू मुनेमाणिक, सुनील अंभोरे, मंजुषा बकतकार यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे