pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयात जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.1

जाफराबाद
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रोफेसर एस. एल. मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक एस. टी. साळवे यांनी जागतिक एड्स दिनाचे महत्त्व प्रतिपादन करत विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सविषयी मूलभूत माहिती, प्रतिबंधक उपाययोजना आणि जागरूकतेची गरज याबाबत मार्गदर्शन केले. कनिष्ठ विभागाच्या प्राध्यापिका डॉ.सुनंदा सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना एड्सविषयी सामाजिक जबाबदाऱ्या आणि आरोग्यसाक्षरतेचे महत्त्व स्पष्ट करुन सांगितले. समाजशास्त्र विभागाच्या सौ.निर्मला खांडेभराड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करत ,एड्स निर्मूलनासाठी तरुणांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एस. एम. पाटील हे होते. यांनी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक भान, आरोग्यदायी जीवनशैली आणि जागरूकता हेच एड्सविरुद्ध लढ्यातील प्रभावी शस्त्र असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. पी. जगतवाड यांनी केले.
या उपक्रमास महाविद्यालयातील प्रसिद्ध विभाग प्रमुख प्रा.अनिल वैद्य राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित हा जनजागृती उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर परिणामकारक ठसा उमटवणारा ठरला.सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख प्रा.अनिल वैद्य यांनी व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे