pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रेल्वे स्टेशन परिसरात सापडलेल्या बालकाच्या नातेवाईकांना आवाहन

नाव-राजू, वय-14 वर्षे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि. 25

राजु, वय 14 वर्ष हे बालक दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुन्या तहसील जवळ, जुना जालना येथे दाखल झालेला आहे. राजू हा जालना रेल्वे स्टेशनला फिरताना रेल्वे पोलिसांना सापडला. त्यांनी राजूला बाल कल्याण समिती, जालना यांच्या ताब्यात दिले आहे.
राजूला बाल कल्याण समितीने शासकीय बालगृह/निरीक्षणगृह येथे त्याला दाखल केले. सदर प्रवेशिताचे आई वडील व इतर नातेवाईक यांचा कोणताही प्रकारे शोध लागला नाही व यापैकी कोणीही त्याला भेटण्यास आले नाही. सध्या त्यांचे राहण्याचे ठिकाण माहित नसल्याने त्यांची गृहभेट/ एस. आय.आर. करता आले नाही.
कु. राजु यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी निवेदन प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांच्या आत शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुना तहसील जवळ, जुना जालना येथे  किंवा मो. 9404000405 या नंबरवर किंवा बाल कल्याण समिती, जालना किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना किंवा जालना रेल्वेस्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे