लोकसहभागामुळे नावारूपास येत असलेली नळविहिऱ्याची जिल्हा परिषद शाळा सध्या चार वर्गातून डिजिटल शिक्षण, लवकर संपूर्ण शाळा होणार डिजिटल

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4
आज आपण सोशल मीडिया आणि काही मुद्रित माध्यमातून जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था, शिक्षकांची अनास्था याविषयी बातम्या पाहतो. मात्र या बाबीला जाफराबाद तालुक्यातील सर्वच केंद्रातील अनेक शाळा अपवाद ठरल्या आहेत. जाफराबाद तालुक्यातील केंद्रातील नळविहिरा शाळा ही एक आदर्श शाळा ठरली आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी वर्ग असून विद्यार्थी संख्या २१३ तर एक मुख्याध्यापक आणि ८शिक्षक कार्यरत आहेत. *चौकट* *शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिये बरोबरच त्यांच्याकडून स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, एन एन एम एस परीक्षा, मंथन परीक्षांच्या साठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार देखील दर्जेदार असतो याशिवाय पूरक आहार देखील दिला जातो. शाळा समिती ग्राम संसद,शिक्षक आणि पालक यांच्या मध्ये योग्य समन्वय असल्याने इंग्रजी माध्यम किंवा अन्य शाळांकडे ग्रामस्थांचा कल नाही* *चौकट* *शाळेत मिळते स्मार्ट शिक्षण* शाळेमध्ये दैनंदिन अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या शालेय मैदानी कवायती, शैक्षणिक सहली, बाजार आणि आनंद नगरी, वार्षिक स्नेहसंमेलन असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण करणारे कार्यक्रम देखील सातत्याने राबविण्यात येतात. यासाठी सर्व ग्रामस्थांनी पालक देखील सातत्याने सहकार्य करत असतात*. *लोकसहभाग वाढतोय* विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि शिक्षकांचे अध्यापन अधिक प्रभावी होण्यासाठी शाळेमध्ये स्मार्ट बोर्ड वित स्मार्ट टीव्ही आहे.अन्य एक स्मार्ट टीव्ही आहे याशिवाय रोशन पिंपळे आणि आणि चंद्रकांत खरात यांनी शाळेला प्रत्येकी एक स्मार्ट टीव्ही भेट दिली आहे. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा शाळेसाठी प्रत्येक वर्गात कचरा कुंडी, सुपळी, नेलकटर, भिंतीवरील घड्याळ, नॅपकिन, पाय पुसण्या आणि अनेक विद्यार्थी उपयोगाच्या वस्तू स्वखर्चाने दिल्या आहेत. यासाठी मुख्याध्यापक शिवहरी नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तू मुनेमाणिक, काशिनाथ उखर्डे, विनोद कळंबे , दिपक चव्हाण , सुनील अंभोरे , ज्ञानेश्वर झगरे, मंजुषा बकतकार , पूजा गहेरवाल यांचे सहकार्य लाभले . शाळा परिसरात ८ पैकी फक्त २ वर्गखोल्या ह्या स्लॅब च्या असून बाकी ६ खोल्या ह्या पत्राच्या आहेत.यासाठी शाळा समिती आणि ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावावा सुरू आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून लवकरच उर्वरित चार शाळा खोल्यांमध्ये देखील स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही उपलब्ध होणार असल्याने शंभर टक्के शाळा डिजिटल होणार आहे.शाळा परिसराला मजबूत आवार भिंतीची ही आवश्यकता आहे. जिल्हा परिषद आणि वरिष्ठ कार्यालयांकडून वेळोवेळी देण्यात येणारे उपक्रम उदाहरणार्थ जागतिक त्सुनामी जनजागृती दिन,जागतिक एड्स दिन,जागतिक आरोग्य आणि इतर दिनविशेष यांची माहिती विद्यार्थ्यांना स्मार्ट बोर्ड द्वारे दिली जाते.याशिवाय शाळेत उपलब्ध असणाऱ्या विज्ञान प्रयोग शाळेतील साहित्यातून प्रत्यक्ष अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येतात. उदा:पेशींची रचना, मानवी हृदय,पचनसंस्था, दूरदर्शीचा वापर आणि इतर प्रयोग सादर केले जातात. विज्ञानातील कठीण वाटणारे घटक विद्यार्थी नाट्यरूपाने सादर करून या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभाग नोंदवतात *ग्रामस्थांची साथ* आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि शिक्षक करत असलेल्या सर्वतोपरी प्रयत्न यांना ग्रामस्थ ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी मोरे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालक भागवत मोरे यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी २० चटया उपलब्ध करुन दिल्या आहेत. याशिवाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास ७० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट ड्रेस शाळा समिती,गावातील व्यावसायिक, शिक्षण प्रेमी नागरिक लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.शाळेचे शिक्षक विनोद कळंबे आणि बदली झालेले शिक्षक प्रमोद कळंबे यांनी देखील एक व्हाईट बोर्ड भेट दिला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम मिन्नु यांनी सुरू केलेल्या सक्षम जालना या उपक्रमांतर्गत प्रत्येक केंद्रातून एका शाळेची निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शाळांसाठी भौतिक सोयी आणि सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे या उपक्रमांतर्गत कुंभारझरी केंद्रातून नळविहीरा शाळेची निवड झालेली आहे.
————————————————————
. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू,भगिनी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, ग्रामस्थ ग्राम संसद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची खंबीर साथ यामुळे आमची नळविहीरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नावावर उपास येत असून आगामी काळात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात आम्ही सहभाग नोंदवणार आहोत. आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन कटीबद्ध आहे* *दत्तू मुनेमाणिक* *पदवीधर शिक्षक नळविहीरा”


