सत्यशोधक विद्यालय येथे जीवशास्त्र विषयाचे मार्गदर्शन संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5
मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे आज दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी जीवशास्त्र विषयाच्या श्रीमती.ज्योती ताटेवर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.श्रीमती जया गुजर यांनी करून दिला. श्री.जिंदमवार हे ही उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाची तयारी करण्यासाठी त्याचा योग्य वेळापत्रक तयार करून बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतल्या पहिजे व योग्य नियोजन करून विषयाची तयारी करावी असे त्यांनी मत मांडले,पुढे त्यांनी NEET ह्या मेडिकल एन्टरन्स विषयी मार्गदर्शन केले.NEET चा सिलॅबस व मार्काचे वर्गीकरण त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिले.त्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिस्त ही स्वतः ला लावून घ्यावी व त्यात सातत्य ठेवावे नंतर त्यांनी समर्पण ह्या विषयी सांगितले जसे की तुम्ही स्वतःचे जे ध्येय निश्चित केले असेल त्यात पूर्ण पणे समर्पित करून घ्यावे असे त्यांनी सांगितले.त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. फूके यांनी अध्यक्षीय भाषण केले त्या मध्ये त्यांनी जे आज पर्यंत झालेले मार्गदर्शन तासिकेचे ज्ञान आत्मसातकरून आपल्या अभ्यासक्रमात सुधारणा करावी असे मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. श्रीमती जया गुजर यांनी परिश्रम घेतले .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा.संदीप फुके यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.पांढरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.लहाने यांनी केले.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


