सत्यशोधक विद्यालय येथे विज्ञान विषयाचे मार्गदर्शन पर तासिकेचे आयोजन

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे दप्तर मुक्त शाळा अंतर्गत आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करताना श्री.भरत कदम यांनी बोर्ड परीक्षे संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी शिकण्याच्या आणि अभ्यासक्रमाचे 3 प्रकार सांगितले. 1. लक्ष्य,2.धैर्य,3.चूलबुल त्यानुसार त्यांनी स्वतः मध्ये सुधारणा करून म्हणजे अभ्यासक्रमाचा वेळापत्रक करून विषयाचे नियोजन करावे व मंडळाच्या परीक्षेसाठी तयारी करावी व यश संपादित करावे. त्यांनी 10 वी च्या विज्ञान विषयाच्या संदर्भातील संज्ञा कशा पाठ करून लक्षात ठेवाव्यात यासाठी काही ट्रिक्स सांगितल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाचे प्रा. श्री.सुमित श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.इफरोज पठाण यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पांढरे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थित होते.


