धनंजय मुळे यांचे सामाजिक भान, काळेगाव जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही भेट

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि खाजगी शाळांच्या वाढत्या आव्हानाला तोड देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे शाळेत सज्ज झालेल्या असून लोकसहभाग आणि शिक्षकांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळातून डिजिटल शिक्षण भेटत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा साठी मिळणारा निधी अतिशय तुकडा असून यांनी तिच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे अनेक दानशूर पुढे येऊन जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी मदत करीत आहेत. काळेगाव ता.जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक धनंजय मुळे यांनी त्यांचे दिवंगत वडील उल्हासराव मुळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ काळेगाव जिल्हा परिषद शाळेला नुकताच एक 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भेट दिला. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद डोईफोडे दीपक मुळे, संजय डोईफोडे, मनीषा वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सावरगाव म्हस्के येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका सुनिता देशपांडे आणि त्यांचे पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मीकांत बुकदाने यांनी देखील सावरगाव म्हस्के जिल्हा परिषद शाळेला एक स्मार्ट टीव्ही नुकताच भेट दिला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम मस्के अध्यक्ष नंदू काकडे यांच्यासह मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ, नसीम शेख, सुखदेव चेके, भाऊसाहेब जाधव, गजानन डोमळे, कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक भान राखून जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राबवत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


