pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालय येथे वाणिज्य शाखेचे मार्गदर्शन संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9

मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे आज दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी वाणिज्य शाखेचे मार्गदर्शक प्रा.डॉ.सतीश ढोके यांनी मार्गदर्शन केले. वाणिज्य म्हणजे पैसे व त्यांचे नियोजन करणे महत्वाचे आहे. RBI ही बँक त्याचे नियोजन करते व RBI ही आपल्या देशाची इकॉनॉमी नियंत्रित करत असते.वाणिज्य ही शाखा विद्यार्थ्यांना बँकेत,CA, निमसरकारी तसेच विविध औद्योगीक क्षेत्रात CS, या पदाच्या नोकऱ्या उपलब्ध राहतात.स्पर्धा परीक्षा,स्वतःचा व्यवसाय या मध्ये मार्ग वाणिज्य शाखेचे महत्वाचे स्थान आहे.तसेच आधुनिक युगात वाणिज्य शाखेचे छोटे छोटे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पूर्ण करून लवकरात लवकर नोकरी करू शकता.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण श्री. फुके यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात अभ्यास लक्षात राहण्याच्या ट्रिक्स विद्यार्थ्यांना दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.संदीप चंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. दिनेश मगरे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री.फुके यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर साहेब तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे