pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानसागर विद्यालय प्रथम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12

जाफराबाद,
येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयाच्या खुशी दुबे व दीपाली भारद्वाज या विद्यार्थिनींनी ‘सेफ्टी मॅनेजमेंट’ या उपकरणाचे सादरीकरण करून प्रथम मिळविला आहे. तर जि. प. प्रशालेला शाळेने द्वितीय क्रमांक मिळवित यश संपादन केले असून, शाळेची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी सतीश शिंदे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे, मुख्याध्यापक उमेश दुनगहू, नारायण पिंपळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील एकूण ६३ शाळांनी सहभाग नोंदवला होता.

यापैकी प्राथमिक गटामध्ये ४२ शाळांनी सहभाग घेतला. तर माध्यमिक गटामध्ये २१ शाळांनी सहभाग नोदविला होता. यावेळी प्राथमिक गटामध्ये लिटिल स्टार इंग्लिश स्कूल, वडाळा यांनी प्रथम क्रमांक, तर जिजाऊ

इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद, द्वितीय तर स्व. भास्कररावजी शिंगणे प्राथमिक विद्यालय, माहोरा यांनी तृतीय क्रमाकांने यश संपादन केले आहे.

माध्यमिक गटात जाफराबाद येथील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. पीएमश्री जि. प. प्रशाला जाफराबाद व्दितीय तर पीएमश्री जि.प. प्रशाला माहोरा शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच प्राथमिक शिक्षक गटामध्ये दत्ता गवळी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गटशिक्षण अधिकारी सतीश शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन

गौरव करण्यात आला. यावेळी प्रा.एम.व्ही. बनकर, प्रा. डॉ. एन. पी. भोसले, प्रा. डॉ. सारिका जाधव यांनी प्रयोगाचे निरीक्षण करून गुणदान केले. यावेळी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खुशी दुबे, दीपाली भारद्वाज यांच्यासह प्रशांत अंभोरे, गजानन वायाळ या विषय शिक्षकांचा शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष सुरेश दिवटे, सचिव बाबुराव जाधव, मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे, प्राचार्य विलास नवले, बी. डी. कोल्हे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे