pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग व्यक्ती या समाजाची खरी ताकद आहेत – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जालना शहरातील दिव्यांग बांधवांचा आज दि.१४ डिसेंबर रोजी चित्रकुट निवासस्थानी सन्मान पूर्वक हार घालून व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संवाद साधताना भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती या समाजाची खरी ताकद आहेत. शारीरिक अडचणी असूनही त्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर जीवनातील अनेक आव्हाने समर्थपणे पेललेली आहेत. दिव्यांग व्यक्तींमध्ये असलेले कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन व संघर्षाची तयारी समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना योग्य सन्मान, संधी व समान वागणूक मिळाल्यास ते समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान देतील. दिव्यांगांचा सन्मान म्हणजे मानवी मूल्यांचा सन्मान असल्याचेही भास्कर आबा दानवे यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सिद्धीविनायक मुळे, श्री. धनराज काबलिये, प्रा. कपिल दहेकर, जीवन सले, सुनील राठी, प्रा. राजेंद्र भोसले, देविदास देशमुख, राजेश जोशी, प्रविण मोहता, बाबासाहेब उगले, अजित मानधने, कल्याण भदनेकर, अमन मित्तल, गणेश खरात, रमेश गोगडे, राजेश देसार, निलेश गवळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे