pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

डॉक्टर पंडित सुरोशे या टेंभूर्णीच्या धावपटुचे संभाजी नगर येथे डंका.

धावण्याची आवड विशेष

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.19

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून डॉ पंडित सुरूशे यांनी विशेष सहभाग घेत टेंभुर्णीचे नाव उज्वल केले आहे.या वेळी १२० धावपटूंचा विक्रमी सहभाग होऊन ​छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी दिनांक १४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन'(सीझन ९) मध्ये स्थानिक धावपटू पंडित सुरशे यांनी २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) गटात ‘अधिकृत पेसर’ (Official Pacer) म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तर दुसरीकडे, त्यांच्या ‘भोकरदन-जाफ्राबाद रनर्स’ ग्रुपने तब्बल १२० स्पर्धकांची नोंदणी करून स्पर्धेत लक्षवेधी उपस्थिती दर्शवली.​पेसर म्हणून कामगिरी पार पडली. मॅरेथॉनमध्ये ‘पेसर’ हा इतर धावपटूंसाठी मार्गदर्शक असतो. या स्पर्धेसाठी पंडित सुरशे यांची ‘१ तास ५० मिनिटे’ या वेळेसाठी पेसर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी आपल्या बसमधील धावपटूंना प्रोत्साहन देत ही जबाबदारी पार पाडली.
​ग्रामीण भागात रुजतेय धावण्याची संस्कृती आणि आवड ही महत्वाची बाब ठरली.
डॉ.पंडित सुरशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियमित सरावामुळे प्रेरणा घेऊन, यावर्षी ‘भोकरदन-जाफ्राबाद रनर्स’ ग्रुपच्या माध्यमातून १२० धावपटूंनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. ग्रामीण भागात आरोग्याप्रति वाढलेली ही जागरूकता विशेष कौतुकास्पद आहे.​प्रशिक्षण आणि मार्गदर्शन:
पंडित सुरशे हे ‘TEAM DOSE-T’ चे मुख्य प्रशिक्षक प्रशांत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. तसेच या उपक्रमाला ‘भोकरदन-जाफ्राबाद रनर्स’ ग्रुपचे लक्ष्मण सुरडकर व डॉ. थोरात, तसेच ‘मॉर्निंग ग्रुप, टेंभुर्णी’ यांच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभते.
​स्पर्धेनंतर बोलताना पंडित सुरशे म्हणाले की,”पेसर” म्हणून निवड होणे हा सन्मान आहेच, पण आमच्या भागातून १२० धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले, याचा विशेष आनंद आहे.आरोग्याची ही चळवळ अशीच पुढे चालू राहील अशी आशा डॉ पंडित सुरुशे यांनी व्यक्त केला.
डॉ सुरुशे हे मॉर्निंग ग्रुप चे सदस्य असून यातील सर्वच मित्र परिवार ने त्यांना या साठी विशेष शुभेच्छा देऊन त्यांचे उत्साह वाढविला.या वेळी डॉ अविनाश सुरुशे,डॉ दीपक नागरे, डॉ एस, बी जायभाये, डॉ रमेश मोठे,डॉ पवन वराडे, मनिष सोमाणी, धीरज काबरा,राजू करवंदे,प्रदीप काबरा, गोपाल बांगड, सर्जेराव कुमकर,यांनी डॉ.पंडित सुरुशे यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे