pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक-2025 महानगरपालिका क्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मा. उच्च न्यायालयातील रिट पिटीशन ४१७१ व ४२४३/२०१४ च्या आदेशास अधीन राहुन जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक-2025कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन महानगरपालिका कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता दि. 15 डिसेंबर 2025 पासुन लागु झाली आहे, सदर निवडणुका निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, शस्त्र परवानाधारक यांना परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. जिल्हयातील शस्त्र परवानाधारकास नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत. संबंधित शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवड्याचे आत संबधितांचे शस्त्र परत करण्यात यावे. सदर आदेश जालना जिल्ह्यासाठी निर्गमित झाल्याच्या तारखेपासुन दि. 16 जानेवारी 2026 पर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे