pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायंन्स ऍण्ड कॉमर्सचा ३६ वा वार्षिक स्नेह सम्मेल्लन २०२५ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

उरण रोटरी एज्युकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चा ३६ वा वार्षिक स्नेह सम्मेल्लन आणि बक्षीस वितरण सोहळा मोठया उत्साहात रोटरी एज्युकेशन सोसायटीची रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर बोरी उरण येथे पार पडला. सदर कार्यक्राचे उदघाटन शाळेचे चेअरमन विकास महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव यतिन म्हात्रे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांचे सत्कार प्रसन्नाकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

रोटरी इंग्लिश स्कुल व कॉलेजच्या मुलांनी संपुर्ण वर्षा मध्ये केलेल्या शैक्षणिक प्रगती, किडा, व विज्ञान प्रदर्शना मध्ये शाळेच्या मुलांनी नेत्र दीपक यश मिळवले होते त्याबद्दल त्यांचा शाळेचे पदाधिकारी, विश्वस्त व सदस्यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी भाषण केले आणि शैक्षणिक व क्रिडा मध्ये यश मिळवलेल्या व सत्कार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अभिनंदन केले. विशेष सत्कार रोटरी शाळेची विद्यार्थीनी कुमारी प्रियांशी मयुर पाटील, हिने भारताचे प्रतिनिधित्व करत सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापुर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विंडसर्किंग स्पर्धेत खुला गट या विभागात कांस्य पदक पटकावलं व भोपाल व मध्यप्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले असुन तिचे विशेष सत्कार संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी पुष्पगुच्छ, मेडल, श्रीफळ व शॉल अर्पण करून करण्यात आले.तसेच दरवर्षी नर्सरी व ज्युनिअर केजी ला मोफत प्रवेश दिले जात असुन यंदाही मोफत प्रवेश दिले जाणार असुन प्रवेश अर्ज रोटरी शाळेच्या कार्यालयात उपलब्ध असुन सदर मोफत प्रवेश संधीचा फायदा पालकांनी घ्यावा असे शाळेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी घोषणा केली. अक्षता घरत प्राचार्य यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकां समोर सादर केला. उरण शहरा मध्ये एक आधुनिक शाळा म्हणुन रोटरी स्कुल प्रगती करत आहे याची जाणीव हया स्नेह सम्मेल्लंन कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण करांना मिळाली.सदर कार्यक्रमास रोटरी एज्युकेशन सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी शेखर व्दा म्हात्रे, खजिनदार प्रसन्नाकुमार, विश्वस्त डॉ. बी. व्ही. देवणीकर, विश्वस्त नरेंद्र पडते, सदस्य राज म्हात्रे, सदस्या मनिषा महाजन, सदस्या पुजा म्हात्रे, सदस्या सरिता पडते व पालक शिक्षक संघटनाचे उपाध्यक्ष कैलास ज ठाकुर उपस्थित होते, सदर कार्यक्रमास पालक वर्ग व उरणच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी संजिता थळी मुख्याध्यापिका यांनी उपस्थीत कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी, संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित मान्यवरांचे, पत्रकारांचे व पालकांचे आभार मानले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी झाल्या बदल सर्व शिक्षक/कर्मचारी वर्गाचे सुध्दा आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे