जालना शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता द्यावी – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.11
जालना शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी भाजपची एक हाती सत्ता जालना महापालिका निवडणुकीत देऊन भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथील भाजपा उमेदवाराच्या प्रभाग क्र.13 व प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवाराच्या प्रचारार्थ केली जालना शहरातील प्रभाग क्र.13 व 16 मधील उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.
ते म्हणाले की केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे महापालिकेत केंद्र व राज्य शासनाकडून विकास कामासाठी निधी आणण्यासाठी जालना महापालिकेत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. मतदारांची संवाद साधताना दानवे म्हणाले मी 2014 पासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असताना व राज्यात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मी केंद्रात राज्यमंत्री व भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना जालना शहरासाठी रेल्वे स्थानकाला नवीन इमारतीसाठी 200 कोटी रुपये मंजूर केले व ते काम प्रगतीपथावर आहे, जालना येथून मुंबईसाठी नवीन वंदे भारत रेल्वे सुरु केली, शंभर कोटीचे रेल्वे पिट लाईन, सरस्वती कॉलनी व सहकार बँक कॉलनीकडे जाणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गास दोन कोटी काम पूर्ण झाले, देशातील तिसरे आयसिटी कॉलेज जालना येथे आणले, शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून काम प्रगतीपथावर आहे, जायकवाडी जालना पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटी, जालना शहरातील अंतर्गत पाणीपुरवठासाठी पाईपलाईन व पाण्याची टाकी उभारण्यासाठी १३० कोटी, जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गास सात हजार कोटी मंजूर करून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे, जालना शहरासाठी सोलर प्रकल्प करिता शंभर कोटी, शहरातील निजाम कालीन लोखंडी पुलाच्या कामास १३.५ कोटी रुपये, शहरात सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण 18 किलोमीटरचा वळण रस्ता, जालना शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी दोनशे कोटी, ओपन जिम साठी सुमारे तीन कोटी, केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या अंतर्गत भूमिगत गटार योजनेसाठी 65 कोटी, राजुर गणपती तीर्थक्षेत्रास तीस कोटीची विकास कामे केली, त्यामुळे भाजपचा महापौर होण्यासाठी जनतेने भाजपचे सर्व उमेदवारांना विजयी करावी व जालना शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल यांच्यासह प्रभाग क्र.१३ उमेदवार सौ. भाग्यश्री जोगस सौ. अनामिका पांगारकर श्री. महेश निकम श्री. ज्ञानेश्वर ढोबळे व प्रभाग क्र.१६ मधील श्री. विनोद रत्नपारखे सौ. कल्याणी पवार सौ. सुचिता टेकाळे श्री. आदित्य बोराडे यांची उपस्थिती होती.


