मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

जालना/प्रतिनिधी,दि.13
जालना शहर महानगरपालिका दिनांक 15 जानेवारी, 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक-2025-2026 करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत, सर्व निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा.खाजगी कंपन्या या मधील आस्थाना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे,अन्ये गृह, नाट्यागृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) या मधील कामगारांना दिनांक 15 जानेवारी, 2026 रोजी मतदानाचा हक्क बजावणेसाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी तसेच निवडणूक होणाऱ्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) येथे मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने उक्त नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीची विशेष सवलत देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रकाद्वारे आदेशीत केलेले आहे.
जालना जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा.खाजगी कंपन्या या मधील आस्थाना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृह, नाट्यागृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) सर्व आस्थापना मालक यांनी त्यांचे कडील जालना शहर महानगरपालिका निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेले कामगारांना दिनांक 15 जानेवारी,2026 रोजी कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादिंना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रकआदेशानुसार कामगारांना सदरहू निवडणूकीच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे अ.मा.जाधव सरकारी कामगार अधिकारी,जालना यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे. वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकारपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडुन मतदानाकरिता योग्य ती सुट्टी प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल. याबाबतीत उद्भवणाऱ्या तक्ररींचे निराकरण करणेसाठी सरकारी कामगार अधिकारी,जालना यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापना करण्यात आलेला असून संबंधित कामगार / कामगार संघटना यांनी दुरध्वनी क्रमांक 02482-2030296 यावर संपर्क साधावा किंवा govtlabour.officer52@gmail.com या ई-मेल आयडी वर तक्रार करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


