pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे 30 मे रोजी आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 29

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 30 मे रोजी सकाळी 9.00 वाजता  वर्कशॉप क्र. 2 आय.टी.आय. चंदनझिरा परिसर जालना येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये  10 वी व 12 वी नंतर काय करावे तसेच भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.

तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे