pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन ई-शिधापत्रिका

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 30 

 राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील अत्योंदय, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेतील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल शेतकरी अशा सर्व शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर-पालवे यांनी केले आहे.

अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनूसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानूसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरुन ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना तहसील कार्यालयात नेहमी जावे लागणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे