pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वसतिगृहासाठी भाडे तत्वावर इमारतीसाठी  इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.31 

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन निर्णयान्वये जालना जिल्ह्यासाठी मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 क्षमता असलेले शासकीय वसतिगृह मंजुर केले आहे. जालना शहरात 100 मुले-मुली सामावू शकतील अशी सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारत भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. तरी शासकीय वसतिगृहासाठी भाडे तत्वावर इमारत देण्यासाठी इमारत मालकांनी मंगळवार दि.20 जुन 2023 पुर्वी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
भाडे तत्वावर घ्यावयाच्या इमारतीत विद्यार्थी निवासी कक्ष, स्वयंपाक गृह, अभ्यागत कक्ष, पार्किंग स्टँड, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, विद्यार्थी सुरक्षिततेच्यादृष्टीने वॉल कंम्पाऊंड, पाणी साठविण्याची व्यवस्था, पाण्याचा स्त्रोत आदीची व्यवस्था  असावी. इमारत भाड्याने देणाऱ्या व्यक्तीने इमारतीचा प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह मंगळवार दि.20 जुन पुर्वी समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे सादर करावेत. असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे