pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उरणतर्फे विविध मोफत आरोग्य तपासण्या, चाचण्या व आरोग्य शिबीर संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

 

उरण विधानसभेचे माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त 01 जून 2023 रोजी शुश्रुष सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, प्रहार ऑप्टिकल व शिवसेना उरण तालुका व शहराच्या वतीने मोफत विविध तपासण्या, चाचण्या व आरोग्य शिबीर संपन्न झाला, यामध्ये हृदयाची तपासणी त्यात बीपी, इसीजी,कोलेस्ट्रॉल,शुगर,थायरॉईड, आरबीएस , एसपीओटू व इतर रक्त चाचण्या त्याचप्रमाणे डोळ्यांचे तपासण्या व मोफत चष्मे वाटप तसेच आरोग्य तपासणी यांचा समाविष्ट होता, या शिबिरात उरण तालुक्यातील व शहरातील 609 रुग्णांनी आरोग्य तपासणी व चाचण्या करून घेतल्या या सर्व तपासण्या व चाचण्यांचा खर्च माजी आमदार मनोहर भोईर यांनी उचललेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांनी माजी आमदार मनोहर भोईर यांचे आभार मानले आहेत.

सदर शिबिराच्या वेळी माजी जिल्हाप्रमुख व जे एन पी टी चे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख कैलास पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका (शहर), श्रीमती सुजाता गायकवाड, तालुका संघटिका (ग्रामीण) भावना म्हात्रे,उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, रजिया शेख, अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, तालुका उपाध्यक्ष रुबीना कुट्टी, विभागप्रमुख एस के पुरो, शैलेश पंडित, माजी नगरसेवक निलेश भोईर, समीर मुकरी, शाखाप्रमुख, गटप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे