pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळा व संस्थांनी अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 28

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनाच्या खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शाळा, संस्थांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात शुक्रवार दि.30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.
वर्ष 2023-24 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार असल्याने अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासन मान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका व नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची शिफारस करण्याचे निर्देश दिले आहे. यास अनुसरून सदर शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करून तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शाळा, संस्थांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम दि.30 जून 2023 पर्यंत आहे. अर्जाचा नमूना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयाअंतर्गत तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या (https://mdd.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर योजना शैक्षणिक अंतर्गत शासन निर्णयासोबतचा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तसेच https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे