ब्रेकिंग
पेंशन अदालतीचे 7 जुलै रोजी आयोजन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.3
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानूसार पेंशन अदालत शुक्रवार दि.7 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील यशवंतराच चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


