pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एक रुपया भरुन सहभाग नोंदवावा; शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे मागितल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी सामुहिक सेवा केंद्र धारकाकडून केवळ एक रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी. तसेच केंद्र चालकाने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, सामुहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येते. परंतू राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने तक्रारी प्रशासनाकडे सादर कराव्यात, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे