pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पथनाट्यातून जनजागृती

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  यांच्यावतीने  बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये पथनाट्याचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
पथनाट्यामध्ये विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  येथील विधी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. त्यांनी बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना तसेच जिल्हा न्यायालयात येणारे पक्षकार, कर्मचारी व विधीज्ञांना वाढत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामांची उदाहरणे देत ती कशी नियंत्रणात येईल याबाबत महत्त्वाचा संदेश दिला. दिग्दर्शन ॲड महेंद्र साळवे यांनी केले तर बंडु जावळे, सतिश खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे