pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात बैठक संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी बहुउद्देशीय मार्गीकेचे मुख्य भुसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या कमिटीची बैठक पनवेल तालुक्यातील भू संपादन अधिकारी मेट्रो सेंटर 1, नवीन पनवेल कार्यालयात संपन्न झाली. त्या बैठकीसाठी
अलिबाग विरार कॉरीडोर बाधित शेतकरी संघर्ष समिती उरण संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर,सचिव -रवींद्र कासुकर,संघटनेचे प्रमुख सल्लागार ॲड सुरेश ठाकूर,सुधाकर पाटील,खजिनदार महेश नाईक, वसंत मोहिते,रमण कासकर, राजाराम जोशी,विजय पाटील, गोपाल जोशी,ॲड. निग्रेश पाटील, अनंत पाटील,नामदेव मढवी,विलास मढवी, जयवंत पाटील, अनिल म्हात्रे, नारायण घरत तसेच गाव कमिटीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. अलिबाग विरार कॅरीडोर चे मुख्य भूसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चा सविस्तर व व्यवस्थित पार पडली. शेवटी त्यांनी सांगितले की जिल्हा भूसंपादन नियोजन कमिटीची बैठक झाल्यानंतर आपल्या पुढील बैठकीत जमिनीच्या होणाऱ्या नुकसान भरपाई , पुनर्वसन बाबत तसेच भावा संदर्भात कळविण्यात येईल असे भू संपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे