pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नागरिकांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

घनसावंगी पोलिस ठाणे हद्दीतील बोलेगाव शिवारातील शेती गट क्र.184 मधील विहीरीमध्ये एका अनोळखी अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास पोलिस ठाणे, घनसावंगी यांना माहिती द्यावी, असे आवाहन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे यांनी केले आहे.
घनसावंगी पोलिस ठाणे यांनी मरणोत्तर पंचनामा करुन या पुरुषाच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात दि.20 जुलै 2023 रोजी पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणी दि.20 जुलै रोजी पोलिस पाटील विलास देविदास आर्दड वय 55 वर्ष यांनी दिलेल्या खबरीवरुन आमृ 31/2023 कलम 374 सीआरपीसीप्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुरुषाचा मृतदेह अंदाजे उंची 5 फुट असून अंगात मेंहदी रंगाचा फुल शर्ट ज्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये लेव्ही एस एम 38 असे लिहीलेले आहे. तर निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व इटकरी रंगाची अंडवियर असून त्यावर इंग्रजीमध्ये डॉलर असे छापील आहे. तसेच पायात राखाड्या रंगाचा सँडल असून ज्यावर स्पोर्ट असे लिहीलेले आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास किंवा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार असल्यास किंवा गुन्हा दाखल असल्यास पोलिस ठाणे घनसावंगी यांना माहिती द्यावी. माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक पी.के.महाजन (मो.9821729223), पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे (मो.8605103703), हेड काँस्टेबल श्री.वैराळ (मो.8668703254) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस उपनिरीक्षक, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे