pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.10 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दि. 20 जानेवारी, 2024 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात असुन जालना जिल्ह्यातील इयत्ता पाचवी वर्गात सन 2023-24 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालकांसह सेवाकेंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट 2023 अशी होती तरी आता प्रशासकीय कारणास्तव दि.17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घेवून ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीचे मुख्याध्यापकांकडुन प्रमाणपत्र पत्र भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करून सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापाकाद्वारे सत्यापित / प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुधारीत प्रमाणपत्र हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्ष-या हे १० ते १०० KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ “www.navodaya.gov.in” यावरून भरावेत. विद्यार्थ्याचा जन्म हा दिनांक 01/05/2012 पुर्वी व 31/07/2014 नंतर झालेला नसावा. तरी जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य  शैलेश नागदेवते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे