जालना : शहरातील गोदावरीबाई शेषराव पार्डीकर (१००) यांचे आज
वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार विवाहित मुली,
जावई, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. नांदेड येथील आरोग्य
विभागाचे निवृत्त कर्मचारी पी.एस. पार्डीकर यांच्या त्या मातोश्री होत.
जालना येथील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यात आले.