pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

खाकी वर्दीतला हवालदार देतोय युवा पिढीला जगण्याचे भान अन् लढण्याचं बळ!

अंबड पोलिस ठाण्यातील हवालदार शामराव वाहुळे यांचा उपक्रम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

काजळा, दि.12

आज काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयात अंबड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्यामराव वाहूळे हे येऊन विद्यार्थ्यांना गरीब परिस्थिती वर मात करून शिक्षण कसे घ्यावे या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वतः चा पूर्ण जीवनपटच उलगडून दाखविला…..याविषयी बोलताना ते म्हणतात…

गरीब परिस्थितीची जाणीव करून देत गरिबीवर कशी मात करता येते, याचे विद्यार्थ्यांना धडे देण्यासह शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे हवालदार शामराव वाहुळे हे शाळा महाविद्यालयात जाऊन मुला-मुलींना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेकांना प्रेरणा मिळाली असून, ज्या शाळेत ते मार्गदर्शन करतात तेथील शिक्षक आणि विद्यार्थी भावुक होतात. गेल्या तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत.

घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथील मूळचे रहिवासी असलेले शामराव वाहुळे हे अंबड पोलिस ठाण्यात न्यायालयीन वारंट बजवण्याचे कार्य करतात. त्यांनी गरीब परिस्थितीशी सामना करून पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. युवा पिढीला गरिबीची जाणीव व्हावी, त्यावर मात कशी करता येईल, याबाबत वाहुळे हे अंबड पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी अंबड, घनसावंगी, जालना, बदनापूर,परतूर, मंठा येथील जवळपास ७० शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

ते गरीब परिस्थितीचे आपले वैयक्तिक अनुभव सांगताना स्वत: भावनाविवश होतात. आपण करीत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गरिबीची जाणीव तर होत आहेच; शिवाय शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनण्याची प्रेरणाही त्यांना मिळत असल्याचे ते सांगतात. आपण करीत असलेल्या या उपक्रमाचे १०० प्रयोग करणार आहोत, शिवाय यावर आत्मचरित्र लिहिणार असल्याचे वाहुळे यांनी ‘live न्युज महाराष्ट्र’ला सांगितले. आपल्या प्रत्येक मार्गदर्शनात ते अन्याय सहन करायचा नाही व अन्याय होऊ द्यायचा नाही. हे तत्त्व अंगी बाळगण्याचे आवाहन युवक- युवतींना करतात. त्यांच्या या उपक्रमाचे आज काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री गुजर सह सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे