pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अवघडराव सावंगी येथे झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर धाड  चार लाखाचा मुद्देमाल जप्त  पारध पोलीस ठाण्याचे सपोनि. चैनसिंग गुसिंगे यांची कारवाई

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव/गणेश शिंदे दि:8

अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथील वनीकरणात काही लोक गोलाकार बसून झन्ना मन्ना ( फेक पत्ता) नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकासह छापा मारला असता 1) वसंता रुखमाजी नरोटे (वय 42 वर्ष रा. गुम्मी ता जि बुलढाणा), 2) प्रकाश नामदेव पवार ( वय 35 वर्ष रा. मासरूळ ता जि बुलढाणा), 3) प्रकाश गोपाळा पाडळे (वय 46 वर्ष रा अवघडराव सावंगी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले._
तर संदीप अभिमनु पालकर (रा मोहळाई ता भोकरदन), शालिक नरवडे (रा अवघडराव सावंगी) हे पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळून गेले._
आरोपी यांच्या ताब्यात नगदी रोख रक्कमसह मोबाईल, मोटार सायकल असा एकूण 3,97,460/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे._
ही कामगिरी शैलेश बलकवडे पोलीस पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, गणपत दराडे उप विभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चैनसिंग गुसिंगे, पोलीस अंमलदार प्रकाश सिनकर, प्रदीप सरडे, शिवाजी जाधव, संतोष जाधव, जिवन भालके, कृष्णा गवळी सर्व पोलीस ठाणे पारध यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे