pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा बाल्मर लॉरी व्यवस्थापनाला दणका! बाल्मर लॉरी कामगारांच्या धरणे आंदोलनाला यश!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26

उरण तालुक्यातील बाल्मर लॉरीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आज यश मिळाले.कंत्राटदार बदलल्या मुळे बऱ्याच दिवसांपासुन संघटनेमार्फत कामगारांना त्याच पगारावर पुर्ववत कामावर घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु नवीन कंत्राटदार 15 ऐवजी फक्त 7 कामगारांना किमान वेतणावर घेण्यास तयार होते. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या दणक्याने व्यवस्थापन आज वठणीवर येऊन 12 कामगारांना अगोदरच्या पगारावर कामावर घेण्यास तयार झाले व उर्वरित 3 कामगार संदर्भात चर्चा करून मार्ग काढू असे चर्चेअंती ठरले. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.महेंद्र घरत यांच्यामुळे कामगारांना न्याय मिळाल्याने सर्व कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे