pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उरणचे चित्रकार कुणाल पाटील यांनी शहीद सैनिक संदीप गायकर यांचे चित्र रेखाटून वाहिली श्रद्धांजली

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

पहलगाम हल्ल्या नंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर द्वारे जशास तसे उत्तर देऊन धूळ चारली.या ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिक संदीप गायकर यांना वीरमरण आले. देशासाठी ते शहीद झाले. त्यांना विविध क्षेत्रातून, विविध स्तरावर भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उरण मधील सारडे गावचे सुपुत्र कुणाल रामचंद्र पाटील यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या देशासाठी शहिद होणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी पेन, पेन्सिल, कोळसा या साहित्याचा वापर करून देशासाठी शहीद झालेले संदीप गायकर यांचे चित्र कागदावर रेखाटले आहे.चित्र रेखाटून त्यांनी शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. कुणाल पाटील हे एका कंपनीत काम करीत असून चित्रकलेची त्यांना लहानपणा पासूनच आवड आहे. पेन, पेन्सिल, कोळसाचा वापर करून त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रे रेखाटली आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे