pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलीस अधीक्षक बलकवडे यांची विशेष मोहीम; पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास बिट अधिकारी आणि अंमलदारावर कडक कारवाई : शैलेश बलकवडे

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र पथके सक्रिय करून कारवाईच्या सूचना अवैध धंदेवाल्यासह त्यांना देणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव/गणेश शिंदे दि.5

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जोरदार कंबर कसली आहे.
जिल्ह्यत मोठ्या प्रमाणात सर्रास अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत._
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी थेट 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे._
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभावीपणे सहभागी होऊन धडक कारवाया करण्याचे तडकाफडकी आदेश काढले आहेत._
अवैध देशी- विदेशी दारू, गावठी दारू, जुगार, मटका चालविणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करण्याची जबाबदारी दुय्यम अधिकारी, बिट अंमलदार, डीबी पथक यांच्यावर निश्चित करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना श्री.बलकवडे यांनी दिले आहे._
याशिवाय, जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर या चार उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिल्या आहेत._
ही पथके ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक अधिकारी आणि अंमलदार यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाई करणार आहेत._
या मोहिमेअंतर्गत दररोज किती कारवाया केल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती, अवैध धंदेनिहाय जप्त मुद्देमाल, रोख रक्कम व आरोपी याचा सविस्तर अहवाल दररोज रात्री 12 वाजेपर्यंत पाठविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत._
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई झाल्यास, तेथे अवैध आढळुन आल्यास संबंधित बिट अधिकारी आणि बिट अंमलदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यामध्ये आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे._

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे