pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

समृध्दी महामार्गावरील वाहतूक ठराविक वेळ वगळता सुरळीतपणे चालू राहील

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.5

हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुची वाहतूक ही पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी दि.10 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दर दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तसेच दि. 25 व 26 ऑक्टोबर या दोन दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात आली आहे. तरी इतर वेळेत समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील, अशी माहिती अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC – १४) ते सावंगी इंटरचेंज (IC -१६) दरम्यान समृध्दी महामार्गवरुन नागपूर कडुन मुंबईकडे जाणारी वाहतूक, “निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४ मधुन बाहेर पडुन निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना – छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC- १६ (छत्रपती संभाजीनगर ) ” येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडुन नागपूर कडे जाणारी वाहतूक, “सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४” या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. असेही अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक, म.रा.र.वि.म./ना.मु.शिंसं, द्रु. महामार्ग, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे